मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीचा भाग कोसळला; काही जण अडकल्याची भीती

Mumbai Fort

मुंबई : मुंबईतील फोर्ट (Mumbai Fort) परिसरातील इमारतीचा काही भाग कोसळला आहे. तुफान पावसामुळे भानुशाली या इमारतीचा काही भाग कोसळला असून, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला.

पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती पावणे चारच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. सध्याच्या घडीला अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलानं सुरू केलं आहे. या ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER