मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट; अमेरिकेच्या निवडणुकीशी जोडला आपला नंबर !

Mumbai Police

मुंबई :- अमेरिकाचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याकडे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेत जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्या निकालाचे आकडे सतत बदलत आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांचा संपर्क नंबर बदलणार अशी चर्चा आहे. याचा संबंध जोडून मुंबई पोलिसांनी, हा नंबर बदलणार नाही, असे सूचित करणारे भन्नाट ट्विट केले आहे.

मंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे – ‘बायडन 264, ट्रम्प 214, मुंबई पोलीस 100 हा आकडा कधीही बदलणार नाही.’

१०० या हेल्पलाइन क्रमांकावरुन मुंबईत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलिसांची मदत घेता येते. या हेल्पलाइन क्रमांकाची जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन नवनव्या कल्पना वापरल्या जातात.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचा 100 हा हेल्पलाइन क्रमांक बदलून 122 होणार आहे. अशी चर्चा सुरू होती. पण मुंबई पोलिसांचा हेल्पालइन नंबर बदलणार नाही. हेच या ट्वीटमधून दिसून येत आहे.

मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल अतिशय सक्रीय आहे. या ट्विटर हँडलवरुन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जातं. अमेरिकेल्या निवडणुकीच्या बदलणाऱ्या आकड्यांचा आधार घेऊन मुंबईतल्या जनतेला जागृत करणारे मार्मिक ट्वीट पोलिसांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER