पोलिसांनी प्रसंगावधान राखून वाचवला तरुणीचा जीव

police

मुंबई : पोलिसांनी प्रसंगावधान राखून, आत्महत्या करण्यासाठी टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या या २० वर्षीय तरुणीचे प्राण वाचवले. ही घटना अंधेरीमधील कोलडोंगरी परिसरात शुक्रवारी घडली.

कोलडोंगरी येथे राहणारी २० वर्षी तरुणी महाविद्यालयात शिकते. घरगुती कारणावरून तिचे कुटुंबियांशी भांडण झाले. रागात ती आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर गेली. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली.

अंधेरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, भिंगर्दीवे, थिटे आणि सोनिया साळवी हे घटनास्थळी गेलेत. प्रवीण तरुणीला बोलण्यात गुंतवून ठेवत तिच्या जवळ पोहोचले आणि तिला कठड्यावरून छतावर खेचले. पोलिसांनी दाखविलेला संयम आणि प्रसंगावधान यामुळे त्या तरुणीचे प्राण वाचले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER