तबलिगी जमात (दिल्ली निजामुद्दीन) मध्ये भाग घेणाऱ्या लोकांची मुंबई पोलिसांची शोधमोहीम सुरु

मुंबई :- सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी तबलिगी जमात (दिल्लीच्या निजामुद्दीन) मध्ये भाग घेणाऱ्या लोकांना मुंबई शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम सुरु केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश असूनही आयोजन करणार्‍या तबलीगी जमातचे निजामुद्दीन मरकाज बुधवारी पूर्णपणे रिकामे करण्यात आले. कारण ते देशभरात कोरोनोव्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे तेथून परत आलेल्या लोकांची शोधमोहीम बऱ्याच राज्यांनी हाती घेतली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने ३६ तास चाललेल्या ऑपरेशननंतर संध्याकाळी ४ वाजता संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. एकूण २३६१ जण आढळले, त्यापैकी ६१७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्या सर्वांना कोरंटाईन करण्यात आले आहे.


Web Title : Mumbai Police’s search drive for people participating in Tablighi tribe

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)