
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये दारूची विक्री सुरू करण्यात आली. दुकानांसमोर गर्दी झाल्याने भौतिक अंतराचे उल्लंघन झाले. सुरक्षा म्हणून घरपोच दारूविक्री सुरू करण्यात आली.पण त्यात ग्राहकांची फसवणूक झाल्याने आता घरपोच दारूविक्रीत ‘ कॅश ऑन डिलिव्हरी’वर भर देण्यात येतो आहे. ऑनलाईन दारूविक्रीत अनेक नंबरवरून घरपोच दारूच्या ऑर्डर घेण्यात येत होत्या व अग्रीम पैसे जमा करा अशा सूचना देऊन खात्यात पैसे जमा करण्यात येत होते. नंतर दारू मात्र पुरवण्यात येत नव्हती. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आता घरपोच दारूविक्रीसाठी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’वर भर देण्यात येतो आहे. यासोबतच ऑनलाईन दारूविक्रीत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ७३ बनावट क्रमांकाची यादी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला