दिशा सालियान प्रकरणाचा तपास बंद होण्याची शक्यता : नितेश राणेंचे राज्य सरकारला गंभीर सवाल

Disha Salian - Nitesh Rane

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या आत्महत्येची चौकशी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राज्य सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

दिशा सालियान प्रकरणाचा तपास पोलिसांना कुठलेही पुरावे न मिळाल्यानं बंद केला जाणार आहे का? मग तपास अधिकारी दोन वेळा का बदलण्यात आला? रोहन राय अद्यापही का फरार आहे ? त्या रात्रीपासून तिच्या बिल्डिंगचा पहारेकरी का गायब आहे? तिचा शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप का बाहेर आला नाही? असे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी विचारले आहेत.

त्याचबरोबर ‘त्या रात्रीचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासण्यात आलं का? कुठल्याही प्रकारचा तपास न करता पोलिस या प्रकरणाचा तपास का बंद करत आहेत? याबाबत काहीतरी शंकास्पद घडत आहे आणि त्यावर आम्ही बारिक लक्ष ठेऊन आहोत. या प्रकरणात पुढे काही पुरावे समोर आल्यास पोलिसांची नाचक्की होऊ नये,’असंही ट्वीट राणे यांनी केलं आहे.

फॉरेन्सिक विभागातील एकाने मला काही कागद दाखवले. ज्यात ही आत्महत्या नसल्याचं स्पष्ट होतं. मग या प्रकरणाचा तपास बंद करण्याची घाई पोलिस का करत आहेत? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER