रामदास आठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीनेही दिले प्रतिउत्तर

Sharad Pawar - Ramdas Athawale

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजप (NCP) प्रणित एनडीएसोबत (NDA) येवून सरकार बनवावे, असा सल्ला रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. त्या सल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात. त्यातील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे एक आहेत’, असा टोला तपासे यांनी लगावला आहे .

‘ज्या वर्गाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने आठवले यांना दिली आहे त्याला बगल देऊन नुसत्या कविता करण्यातच ते व्यस्त असतात आणि फुकटची प्रसिद्धी कशी मिळेल मग ते कारण काहीही असो त्याचा त्यांचा सतत प्रयत्न असते’, अशा शब्दात महेश तपासे यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली.

एकीकडे मोदी सरकार हळूहळू सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत असताना त्या कंपनीतील उपेक्षित वर्गाच्या कामगार, कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षणासाठी आपलं मंत्रालय काय करीत आहे?, असा सवालही महेश तपासे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केला आहे. करोना व त्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मागास समाजातील उद्योजक, अल्पभूधारक शेतकरी या वर्गातील लोकांसाठी आपण फक्त कविताच केली का, असा खडा सवालही महेश तपासे यांनी रामदास आठवले यांना विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER