परमबीर सिंहांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर काँग्रेस हायकमांड ‘अ‍ॅक्टिव्ह’

मुंबई : परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि सरकारच्या पातळीवर ‘डॅमेज’ कंट्रोलचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. या सगळ्या घडामोडीनंतर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हीडिओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना यासंदर्भात निर्देश दिले.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सरकारची बाजू लढवत आहेत. या सगळ्यात काँग्रेसचे (Congress) नेते म्हणावे तितके सक्रिय नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही(Nana Patole) यावर फारसे बोलत नाहीत. ना दिसत नाहीत. (congress high command active after parambir singh letter bomb)

एच.के. पाटील यांनी यासंदर्भात नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दिल्लीत ‘काका मला वाचवा’ असा आवाज घुमत होता – भाजपा

भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्यंगचित्र ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका केली. या व्यंगचित्रात घाबरलेले अनिल देशमुख आणि त्यांच्यापाठी शरद पवारांची सावली आहे आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh)हे ‘काका मला वाचवा’ अशी हाक देत आहेत.

हे व्यंगचित्र ट्विट करताना भाजपाने कॅप्शन दिले – पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे!. भाजपच्या(BJP) या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीवर होता.

ही बातमी पण वाचा : पवारांच्या निवासस्थानी मोठी घडामोड; संजय राऊतांना डावलून बैठकीत काँग्रेस नेत्याची एंट्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER