मुंबई मनपा स्वबळावर लढणार; नाना पटोले यांची घोषणा

Nana Patole

मुंबई : “आमची संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरू आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. २०२२ची लोकसभा निवडणूक सध्या लांब आहे. पक्षाचा विस्तार आणि स्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.” अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. काँग्रेसची निवडणुकीसाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरू

नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी धडाडीने काम करणे सुरू केले आहे. सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान त्यांच्या देहबोलीवर आत्मविश्वास वाटला. आगामी काळात मुंबई, औरंगाबाद, नाशिक, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांत मनपाच्या निवडणुका होत आहेत. नाना पटोले यांनी आगामी मुंबईची महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.

भाजपला नेहमी फेकतो

मागील विधानसभा निवळणूक पार पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. युती तुटण्याबद्दल मागील काही दिवसांपासून भाजप नेते नवनवे खुलासे करत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वसन दिलेच नव्हते, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. “भाजपची फेकूगिरी दीड वर्षांनंतर लक्षात आली. त्यांनी शिवसेनेला बंद दाराआड काय आश्वासन दिले होते, पण भाजप नेहमीच फेकतो. भाजप कुठलेही आश्वासन पूर्ण करत‌ नाही.” असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER