काँग्रेसची घोषणा : मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढू !

BMC

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत असली तरी महापालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या या घोषणेमुळे महाआघाडीत खळबळ उडाली आहे. यापूर्वी, आगामी सर्व निवडणुका एकत्रितपणे लढविल्या जातील, अशी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी एकत्रच निवडणुका लढेल, असे म्हटले होते. आता काँग्रेसने आपली वेगळी भूमिका जाहीर केल्यामुळे महाआघाडीत एकता नसल्याचे दिसते. शिवसेनेसोबत निवडणुका लढल्यास आपला पारंपरिक मतदार दुरावेल, असे काँग्रेसला वाटते. त्यामुळेच काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER