कंगनाविरोधातील लढ्यासाठी मुंबई महापालिकेने खर्च केले ८२ लाख

Kangana Ranaut - BMC

मुंबई : मुंबईत (Mumbai) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरुद्ध मुंबई महापालिका (BMC) हा वाद चांगलाच गाजला. पण, हा वाद कोर्टात गेल्यानंतर कंगना विरोधात बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या तिजोरीतील तब्बल ८२ लाख खर्च केलेत. या वादात पालिकेची बाजू मांडण्यासाठी अस्पी चिनाॅय या वकिलाला मानधनापोटी आतापर्यंत तब्बल ८२ लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

कंगनाप्रकरणी पालिकेने न्यायालयात नेमलेल्या वकिलाला आतापर्यंत किती मानधन देण्यात आले, याची माहिती शरद यादव (Sharad Yadav) या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिकेकडे मागितली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात २२ सप्टेंबरपर्यंत २२ लाख ५० हजार;तर ७ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख रुपये, असे एकूण ८२ लाख ५० हजार दिले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

कोरोना (Corona) आणि लॉकडाऊनचा (Lockdown) काळ हा आधीच आर्थिकदृष्ट्या पाय खड्ड्यात नेणारा काळ. अशावेळी सामान्यांच्या कराचा पैसा हा खरंतर सामान्यांसाठीच वापरला जाणं जास्त महत्वाचं आहे. पण, एकीकडे कोरोना काळात अनेक जण सुविधांपासून वंचित राहतात आणि दुसरीकडे एका अभिनेत्रीसोबतच्या वादासाठी पैसा पाण्यासारखा खर्च केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER