मुंबई मनपाच्या भ्रष्ट कारभारामुळे दोन लेकर आईला मुकली – किरीट सोमय्या

Kirit Somaiya

मुंबई : घाटकोपर येथील शिवाजीनगर, असल्फा व्हिलेज निवासी शीतल दामा (३२) यांचा उघड्या गटारीत पडून मृत्यू झाला. त्यांना ६ वर्षांचा मुलगा आणि २ वर्षांची मुलगी आहे. याबाबत मुंबई मनपाच्या कारभारावर टीका करताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले – मुंबई मनपाच्या भ्रष्ट कारभारामुळे दोन लेकर आईला मुकली.

ते म्हणाले की, या प्रकरणी गटाराचे निकृष्ट काम करुन भ्रष्टाचार करणारा कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या गटारांवर आधी सिमेंटचे ढापे बसवलेले होते. जानेवारी दरम्यान गटारांच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले व त्यानंतर त्यावर निकृष्ट ढापे बसवण्यात आले.

३ ऑक्टोबरला संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसात गटारात पडून शीतल वाहून गेल्या. त्यांचे प्रेत आज ५ ऑक्टोबरला पहाटे ३ वाजता वरळीतील नाल्यात सापडले.

वॉर्ड क्रमांक १६० शिवाजीनगर, असल्फा व्हिलेज परिसरातील नागरिकांनीही याबाबत मनपाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कंत्राटदार आणि मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER