मुंबई पालिका कायद्यानुसार काम करत आहे : शरद पवार

BMC - Sharad Pawar

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) शिवसेनेबरोबर (Shiv Sena) वाद सुरु आहे. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोडा चालविण्यात आला . यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे . मुंबई पालिका कायद्यानुसार काम करत असल्याचे पवार म्हणाले आहे.

कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने तिचा चांगलाच समाचार घेतला . यावर मुंबई कुणाच्या बापाची नाही, 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा , असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले . यावरून चांगलेच वादंग पेटले आहे .

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम तोडण्याची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. महापालिकेने उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने देण्यात आली स्थगिती. याप्रकरणी उद्या तीन वाजता सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER