मुंबई महापालिकेकडून रुग्णालयांना आठ तास पुरेल एवढा डिझेलचा साठा करण्याचे निर्देश

Iqbal Chahal - Mumbai Power Cut

मुंबई : पॉवर ग्रीडच्या बिघाडामुळे मुंबईसह (Mumbai) उपनगरातील वीज पुरवठा (Power Cut) बाधित झाला होता. त्यामुळे मुंबईतील संपूर्ण यंत्रणा ठप्प पडली होती. दरम्यान, याचा फटका रुग्णालयांना बसला. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इकबाल चहल (Iqbal Singh Chaha) यांनी रुग्णालयांना डिझेलचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त म्हणाले की, ग्रिड बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला असताना मुंबईतील रुग्णालयांना विशेषत: आयसीयूची यंत्रणा बिघडू नये यासाठी किमान आठ तास डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चहल यांनी निवेदनात म्हटले आहे की, “रुग्णालयांमध्ये विशेषत: आयसीयूमध्ये बिघाड होऊ नये म्हणून कमीतकमी आठ तास डिझेलचा पुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित रुग्णालयांनी संबंधित एसडब्ल्यूएम ट्रान्सपोर्ट गॅरेज अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. काही समस्या असल्यास कृपया संपर्क साधावा. सोबतच मुंबई महापालिकेने अत्यावश्यक मदतीसाठी हेल्पलाीन नंबर जारी केले आहे. महापालिकेने नागरिकांसाठी 022-22694727, 022-226947725, 022-22704403 हे इमरजन्सी नंबर जारी केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER