कोरोना नियम मोडल्याने गौहर खानवर मुंबई मनपाने केला एफआयर दाखल

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रोज कोरोनाग्रस्तांची (Corona virus) संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच सरकारने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोनाचे नियम सगळ्यांनी पाळावे असे आदेशही पुन्हा एकदा देण्यात आलेले आहेत. गेले ८-९ महिने संपूर्णपणे बंद असलेले बॉलिवूड (Bollywood) पुन्हा कामाला लागले आहे. सुरुवातीला बॉलिवूडकरांनी कोरोना नियमांचे पालन केले पण नंतर त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अभिनेत्री गौहर खानचाही समावेश आहे. मात्र या कलाकारांना ते म्हणजे जमिनीपासून दोन इंच वर असलेले महान कोणीतरी आहोत असे वाटत असते. त्यामुळे नियमांची पायमल्ली करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. कलाकार असल्याचे गौहर खानच्याही डोक्यात असल्याने तिने मुंबई मनपाच्या (Mumbai Municipal Corporation) नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण मनपाने याकडे दुर्लक्ष न करता नियम मोडल्याने तिच्यावर चक्क एफआयआर दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच गौहर खानला (Gauhar Khan) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तिला कोरोनाची लागण झालेली असल्याने मनपाने तिला घरातच क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र गौहर खानने मनपाच्या या नियमांना पायदळी तुडवले आणि बिनधास्त बाहेर फिरू लागली होती. एवढेच नव्हे तर तिने चक्क शूटिंगमध्येही भाग घेतला. कोरोना झाल्याचे तिने सेटवर कोणालाही सांगितले नाही. गौहरची माहिती घेण्यासाठी मनपा अधिकारी जेव्हा तिच्या घरी गेले, तेव्हा त्यांना ती घरी नसल्याचे समजले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता ती बाहेर जात असून शूटिंगमध्येही भाग घेत असल्याचे कळले. तेव्हा लगेचच कोरोना नियम मोडल्याने तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. मनपाने त्यांच्या सोशल मिडिया (Social Media) अकाउंटवर एफआयआरची कॉपी टाकली आहे. मात्र यात गौहर खानचे नाव पुसट केले आहे. एफआयआर दाखल झाल्याने गौहर खानपुढील अडचणी आता वाढल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER