मुंबई मनपा निवडणूक : मनसेची घोषणा हिंदुत्व; परप्रांतीयांचा मुद्दाही सोबत- नांदगावकर

Bala Nandgaonkar

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना  (मनसे) मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. हिंदुत्व हा मनसेचा प्रमुख अजेंडा असेल आणि परप्रांतीयांचा मुद्दाही सोडणारही नाही, असे मनसेचे बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितले. ते सांगलीतील पदवीधर निवडणुकीच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते.

शिवसेना आणि भाजपा यांच्यातील लढाईमुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते प्रवीण दरेकर, मुंबई महानगरपालिकेत मनसेशी युती करायची की नाही, याचा निर्णय योग्य वेळी घेऊ, असे म्हणाले होते. त्यामुळे भाजपा आणि मनसे युती करणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

प्रताप सरनाईकांनी ईडीच्या चौकशीला तोंड द्यावे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. राज ठाकरे तेव्हा ‘ईडी’च्या चौकशीलाही सामोरे गेले. आता शिवसेनेच्या नेत्यांनीही चौकशीला सामोरे जावे. सुडाचे राजकारण असले तरी प्रताप सरनाईकांनी चौकशीला सामोरे जावे, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER