मुंबई मनपा : राष्ट्रवादीची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना मिळण्याची चर्चा

Sharad Pawar & Rohit Pawar & Supriya Sule

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात  आहे. या चर्चेवर प्रतिक्रिया देताना नबाब मलिक म्हणालेत – निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून अजून कोणाचीही निवड झालेली नाही.

सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी लक्ष घातल्यास चांगलेच होईल; पक्षाला फायदाच होईल. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर भगवा फडकणारच यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसने मात्र स्वबळावर लढण्याची घोषणा करत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीनंदेखील पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं पक्षाची बांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. कोरोनाचं संकट येण्यापूर्वी वांद्रे कुर्ला संकुलात शहरातील सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याला आठ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना (Corona) संकट असल्यानं सध्या मेळावे, कार्यक्रम घेता येत नाहीत; पण संघटनेच्या बांधणीवर काम सुरू आहे. पूर्ण अनलॉक झाल्यावर मेळावे, कार्यक्रम घेता येतील, असे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचं मिशन मुंबई : मुम्बई महापालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीसह उतरणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER