कोविड ट्रीटमेंटवर एकट्या मुंबई पालिकेने खर्च केले 900 कोटी तर, एमएमआर मधील इतर शहरांचा खर्च निम्म्याहून कमी

Corona Virus-BMC

मुंबई: गेले सात महिन्यांपासून राज्य कोरोनाची (Corona Virus) लढाई लढत आहे. कोरोनासोबत लढा देताना राज्य सरकारच्या आर्थिक धोरणात मोठी तफावत आढळून आली आहे. एकट्या मुंबई महापालिकेत (BMC) कोविड उपचारावर 900 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर, मुंबईच्या आसपासच्या तीन मोठ्या शहरी केंद्रांनी मिळून केवळ 125 कोटी रुपये खर्च केले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी), कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) आणि पनवेल महानगरपालिका (पीएमसी) यांनी अनुक्रमे 45 कोटी, 57 कोटी आणि 25 कोटी रुपये, सुविधांवर, वैद्यकीय कर्मचार्‍यांना भरपाई आणि साथीच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी खर्च केले. मागील सहा महिने त्यांचा दरडोई खर्च 300 – 317 रुपये मुंबईच्या अर्ध्यापेक्षा म्हणजे 634 रुपये इतका कमी आहे. या भागातील ठाणे आणि मीरा-भाईंदर यांनी अद्याप कोविड खर्चाचे संकलन केले नाही.

बीएमसी मुंबईतील व राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. महापालिकेने नुकतेच काढलेला खर्चाचा अंदाज 14.2 दशलक्ष होता. लॉकडाऊननंतर सुरुवातीच्या काही महिन्यांत कोविड प्रकरणांमध्ये जी वाढ झाली त्या प्रकरणांचा खर्च बीएमसी मोठ्या प्रमाणात उचलत असल्याचे एका अधिका-याने सांगितले.
यामुळे प्रशासनास तेवढया अधिक सुविधा लवकर उपलब्ध करण्यास भाग पाडले. परंतु, याउलट बीएमसीच्या तुलनेत अन्य महापालिकांमध्ये कोविडची अधिक प्रकरणे पाहायला मिळाली. यामुळे अनेकांनी बीएमसीच्या खर्चाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, एनएमएमसी आणि केडीएमसीने कोविड ट्रीटमेंटवर खर्च केलेली रक्कम त्यांच्या वार्षिक बजेटच्या 2-3% असेल. राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत म्हणून त्यांनी अनुक्रमे 225 कोटी आणि 214 कोटी रुपये मागितले आहेत.टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER