
मुंबई :- माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. ८० व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांपासून ते दिग्गज नेते मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमस्थळी पोहचल्यावर अजित पवार(Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यांचा हा ८० वा वाढदिवस आहे. राज्यात कोविडचे वातावरण आहे; परंतु सर्व खबरदारी घेऊन जल्लोष साजरा करत आहोत. जवळपास ६० वर्षांपेक्षा जास्त काळ पवारसाहेबांना राजकारणात झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
तत्पूर्वी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘आज देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झाले की, लोक म्हणतात, यामागे शरद पवार यांचा हात आहे; पण मी या सर्व गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. मी असे म्हणेन की जेव्हा जेव्हा देशात किंवा राज्यात समस्या उद्भवतात तेव्हा प्रत्येक जण पवार यांच्याकडे या आशेने पाहतो की, ते नक्कीच तोडगा काढतील, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला.
हिमालयातील उंचीच्या महाराष्ट्रातील सह्याद्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे म्हणत अजित पवार यांनी भावना व्यक्त केली.
ही बातमी पण वाचा : …आणि उदयनराजे भोसलेंनी शरद पवारांसोबतचा फोटो केला शेअर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला