नियम धाब्यावर बसवून मुंबईच्या महापौर, शिवसेना आमदारांचे लसीकरण; शेलारांचा गंभीर आरोप

Ashish Shelar - Kishori Pednekar

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना (Corona)रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून दिली जात आहे. केंद्र सरकारने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी लसी दिल्याचा आरोपही केला जात आहे. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhana) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसी देण्यात आल्या असून, सरकारच्या भोंगळ कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपचे आमदार यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोनामुळे राज्यात हाहाकार, बेड, डॉक्टर, नर्स, ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आघाडी सरकार अपयशी, रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू, दुसरीकडे मंत्र्यांवर ३५० कोटींचे वसुलीचे आरोप… मुख्यमंत्री मौनात! सारे हाताबाहेर गेले.

१ कोटी ६ लाख लसी महाराष्ट्राला मिळाल्या. त्यातील ५ लाख डोस वाया घालवले. नियम डावलून ठाण्याचे महापौर, शिवसेना आमदारांनी लस घेतली. मुंबईत फ्रंटलाईन कर्मचारी दाखवून इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांना लस दिली! काळाबाजार सगळा! आपले अपयश लपवायला केंद्र सरकारच्या नावाने “शिमगा” थांबवा! असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button