लॉकडाऊन आणि आर्थिक चटके न सोसवल्याने एका वडापाव विक्रेत्याचा 6व्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू

Lockdown-Hit Ghatkopar Vada Pav Seller Jumps

मुंबई : मंगळवारी पहाटे घाटकोपर (Ghatkopar) पूर्व येथील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय वडा पाव विक्रेत्याने आपल्या निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. लॉकडाऊनमुळे (Lockdown) आलेल्या आर्थिक अडचणींना कंटाळून त्याने आपले जीवन संपवले.

गेल्या सहा महिन्यांपासून कोणताही व्यवसाय नाही. यामुळे अखेर आर्थिक चटके न सोसवल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहाटे चारच्या सुमारास पंतनगर येथील गोल्डन सोसायटीतील काही रहिवाशांना इमारतीच्या कंपाऊंडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ती आढळली आणि चौकशी केली असता तो दुसरा कोणी नसून आपल्याच बिल्डींगमधला रहीवासी सदानंद नाईक असल्याचे समजले. त्याला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पंतनगर पोलिसांनी सांगितले की, नाईक शौचालयात गेले आणि त्याने सहाव्या मजल्यावरील घरातून उडी मारली. कोरोना  (Corona) व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लादले गेले तेव्हापासून नाईक यांचा वडा पाव स्टॉल बंद होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER