
मुंबई : करण जोहर याच्या घरी २०१९ ला झालेल्या विवादित पार्टीबाबतची काही कागदपत्र करण जोहरने (Karan Johar) एनसीबी (अमली पदार्थ प्रतिबंधक खात्या)ला सादर केली आहेत.
२०१९ च्या त्या पार्टीबाबत माहिती देण्याबाबत एनसीबीने गुरुवारी करणला नोटीस बजावली आहे. या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओत चित्रपट सृष्टीतील काही नामवंत कलाकार हजर असलेले दिसत आहेत. या पार्टीत अमली पदार्थांचे सेवन करण्यात आले, अशी तक्रार शिरोमणी अकाली दलाच्या माजी आमदारानी या वर्षी सप्टेंबर महिन्यात एनसीबीकडे केली होती.
या पार्टीत रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल हजर होते. हा व्हीडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. पण, त्यावेळी एनसीबीने त्याची दखल घेतली नव्हती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला