मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

Laxman Savadi - CM Uddhav Thackeray

बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भाग हा केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली. त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी बेळगाव (Belgaum) तर सोडा, मुंबईपण कर्नाटकाचा भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहेत. त्यामुळे आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे. मुंबईवर आमचाही हक्क आहे. मुंबई प्रदेश केंद्रशासित करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलं. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमा भागात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान सवदी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना कुठली भूमिका घेणारा याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त भागाला केंद्रशासित करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटल्यानंतर कन्नडीगांनी बोंब मारण्यास सुरुवात केली आहे. काही संघटनांनी आज प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : सघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाच्या प्रतीकात्मक प्रती जाळल्या. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका आणि अन्य संघटनांनी आंदोलन केलं. केंद्र सरकारनं या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी आणावी अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER