इंदू मिल स्मारक : डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ; अनेक मंत्र्यांत नाराजीचा सूर

Uddhav Thackeray-Mumbai Indu Mill

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb ambedkar) यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या (Mumbai Indu Mill)जागेवर उभारण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे.

यावेळी अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. मात्र या समारंभाच्या निमंत्रणावरून अनेक मंत्री नाराज असल्याची माहिती आहे . या कार्यक्रमाचे  निमंत्रण अनेक मंत्र्यांना पोहचलेच नाही.  अनेकांना कार्यक्रमाची माहितीसुद्धा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनादेखील या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत किंवा नाही याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.

ही बातमी पण वाचा : उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER