मुंबई इंडियन्सचा आठ विकेट्सने विजय; गुणतालिकेत पुन्हा अव्वल

ipl-2020-Mumbai Indians.jpg

मुंबई : आयपीएल २०२० (IPL 2020) मध्ये ३२ वा सामना अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने आठ  विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. तर या पराभवानंतरही कोलकाता चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

मुंबईने आतापर्यंत आठ  सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि दोन सामने पराभूत झाले आहेत. तर कोलकाताने आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत आणि चार  सामने पराभूत झाले आहेत.

या आयपीएल-२०२० मधील ३२ व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉइंट टेबल :

  • १- मुंबई इंडियन्स: (सामने ८, विजय ६, पराभव २, गुण १२, नेट रन रेट +१.३५३)
  • २- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ८, विजय ६, पराभव २, गुण १२, नेट रन रेट +०.९९०)
  • ३- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ८, विजय ५, पराभव ३, गुण १०, नेट रन रेट -०.१३९)
  • ४- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने ८, विजय ४, पराभव ४, गुण ८, नेट रन रेट -०.६८४)
  • ५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ८, विजय ३, पराभव ५, गुण ६, नेट रन रेट +०.००९)
  • ६- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ८, विजय ३, पराभव ५, गुण ६, नेट रन रेट -०.३९०)
  • ७- राजस्थान रॉयल्स : (सामने ८, विजय ३, पराभव ५, गुण ६, नेट रन रेट -०.८४४)
  • ८- किंग्स XI पंजाब : (सामने ८, विजय २, पराभव ६, गुण ४, नेट रन रेट -०.२९५)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER