मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल

Mumbai Indians

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग- २०२० (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. शनिवारी (३१ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) नऊ गडी राखून पराभव केला. गुणतालिकेत १८ गुणांसह हा संघ पहिल्या स्थानावर आहे. मात्र, एका खास कारणामुळे मुंबई संघ आयपीएल-२०२० चा खिताब जिंकणार अशी जोरदार चर्चा आहे.

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा ठरला पहिलाच संघ
प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला आहे. मुंबई सध्या १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे मुंबई प्ले ऑफ फेरीत होणारा पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे.

मुंबई संघाच्या बाबतीत एक योगायोग जुळून आला आहे. जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्सने क्वालिफायरचा पहिला सामना खेळला आहे तेव्हा त्यांनी नेहमीच आयपीएल करंडक जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ क्वालिफायरचा पहिला सामना खेळला होता आणि या चारही वर्षांत आयपीएल करंडक जिंकला होता. आता या वेळेसही मुंबई क्वालिफायर एक खेळणार आहे, अशा परिस्थितीत संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनणार का हे पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER