मुंबई इंडियन्सने शेअर केला रोहित शर्माचा प्रॅक्टिस व्हिडिओ, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याबद्दल चाहत्यांनी बीसीसीआयवर व्यक्त केला संताप

Rohit Sharma - Mumbai Indians - IPL 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) फ्रेंचायजी टीम मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेटवर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. रोहितच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) (BCCI) जोरदार हल्ला चढविला आहे. सोमवारी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियन दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून रोहित त्याचा भाग नाही. रोहितच्या जागी केएल राहुलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.

रोहितची निवड न केल्याबद्दल बीसीसीआयवर चाहत्यांचा रोष आहे. रोहित आणि इशांत शर्मा यांच्या दुखापतीवर सतत नजर ठेवली जाईल असे बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. गेल्या आठवड्यात रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती तर इशांत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारतात परतला आहे. त्यानंतर इशांत बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. या दौर्‍यासाठी निवड समितीने चार अतिरिक्त गोलंदाजांची निवड केली आहे – कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, ईशान पोरेल आणि टी नटराजन जे या दौर्‍यावर भारतीय संघ सोबत असतील.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय संघ-
टी-20: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उप-कर्णधार और यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सैमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती.

वनडे : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, लोकेश राहुल (उप-कर्णधार और यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शादुर्ल ठाकुर.

टेस्ट : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER