IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सचे आईपीएलवर राज, दिल्ली कॅपिटल्सला हरवून विक्रमी पाचवे विजेतेपद जिंकले

Mumbai Indians beat Delhi Capitals in IPL to win record fifth title

दुबईत खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५६ धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक ५० चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने ३८ चेंडूत ५६ धावा आणि शिखर धवनने १३ चेंडूत १५ धावा केल्या. त्याचवेळी मुंबईकडून ट्रेंट बाऊल्टने चार षटकांत ३० धावा देऊन तीन गडी बाद केले, तर नॅथन कूल्टर नाईलने दोन आणि जयंत यादवने एक गडी बाद केला.

प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १८.४ षटकांत १५७ धावांचे लक्ष्य गाठले. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. याशिवाय डी कॉकने १२ चेंडूत २० धावा, सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा, ईशान किशनने १९ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. त्याचवेळी दिल्ली कडून नॉर्टजेने २.४ षटकांत २५ धावा देऊन २ गडी बाद केले, मार्कस स्टोइनीस आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

दिल्लीने अंतिम सामन्यासाठी त्यांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट तंदुरुस्त असून प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम आहे. मागील सामन्यात तो जखमी झाला होता. जयंत यादवला स्पिनर राहुल चहरच्या जागी प्लेइंग इलेव्हन मध्ये घेत मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघात बदल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER