मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच गडी राखून केला पराभव

Mumbai Indians beat Delhi Capitals by five wickets

अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या २७ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रविवारी मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत चार गडी गमावून १६२ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्स कडून शिखर धवनने सर्वाधिक नाबाद ६९ धावांचे योगदान दिले. यावेळी त्याने फलंदाजीमध्ये ६ चौकार आणि १ षटकारही लगावला. कर्णधार श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ४२, अजिंक्य रहाणेने १५ चेंडूत १५, मार्कस स्टॉयनिसने ८ चेंडूंत १३ आणि एलेक्स कैरीने ०९ चेंडूत १४ ((नाबाद) धावांचे योगदान दिले. मुंबईकडून क्रुणाल पांड्या सर्वात किफायतशीर गोलंदाज राहिला. त्याने ४ षटकांत २६ धावा देऊन २ खेळाडूंना पॅव्हिलियनमध्ये पाठवले, तर ट्रेंट बाउल्टने ४ षटकांत ३६ धावा देऊन एक बळी घेतला. याशिवाय कोणत्याही गोलंदाजाला बळी घेण्यात यश मिळाले नाही.

दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अशाप्रकारे, दिल्ली कॅपिटल्स १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, मुंबईने ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकून २ पराभवानंतर १० गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER