IPL 2020: क्वालिफायर १ मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभूत करत गाठली अंतिम फेरी

Mumbai Indians

गुरुवारी दुबईत खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा ५७ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु कर्णधार श्रेयस अय्यरचा संघ निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४३ धावा करू शकला.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईने निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून २०० धावा केल्या. मुंबईकडून ईशान किशनने ३० चेंडूत सर्वाधिक नाबाद ५५ धावा केल्या. त्याशिवाय सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूत ५१, क्विंटन डिकॉकने २५ चेंडूत ४० आणि हार्दिक पांड्याने १४ चेंडूत नाबाद ३७ धावांचे योगदान दिले. तसेच, अश्विन हा दिल्लीचा सर्वात किफायतशीर गोलंदाज राहिला, त्याने त्याच्या चार षटकांत २९ धावा देऊन तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याव्यतिरिक्त, एनरिच नॉर्टजे आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER