वसई-विरारमध्ये केबल नेटवर्कवर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग

Vasai-Virar, Classes For Std X Students On Cable Network

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर देशभरात ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरू असली तरी अद्याप 27 % मुला-मुलीकडे इंटरनेटची बिलकुल सुविधा किंवा साधा मोबाइल ही नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पालघर जिल्हातील दुर्गम भागातील तसेच वसई-विरारमधील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाची गंगा’ पोहोचविण्याकरिता बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांनी ‘शाळा आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम आजच्या शिक्षक दिनी हाती घेतला असून, यामुळे इयत्ता 1 ते 10 वीच्या वर्गातील लाखो मुलांना याचा लाभ होणार आहे.

‘शाळा आपल्या घरी’ या अनोख्या उपक्रमाद्वारे वसई तालुक्यातील शिक्षकांना आवाहन करून, पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी भाषेत रेकाॅर्ड करण्याचे काम सुरू झाले आहे. हा अभ्यासक्रम वसई तालुक्यातील कार्यरत स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून लाखो मुलांच्या घराघरात पोहोचविला देखील जाणार आहे. टीम वसई फर्स्ट आणि डिजिटल वसई या सामाजिक संस्थाचे या उपक्रमास तांत्रिक सहकार्य लाभले आहे. एवढंच नव्हे तर हा रेकाॅर्ड केलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही स्थानिक पातळीवर राबवायाचा असल्यास बहुजन विकास आघाडीकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगण्यात आले. एकूणच हा अभ्यासक्रम एस. एस. सी बोर्डावर आधारित असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER