सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

CM Uddhav Thackeray - Local Train - Bombay High Court

मुंबई : राज्य सरकार हळूहळू लॉकडाऊन (Lockdown) शिथिल करीत असल्याने सरकारने लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना (Mumbai) लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला केली आहे.

राज्यातील लॉकडाऊन हा शिथील करण्यात येत आहे. मॉल्स, हॉटेल्स सुरु करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयातही कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीत अनिर्वाय करण्यात आली आहे. तसेच खासगी कार्यालयांमधील कर्मचारी कामावर येऊ लागले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आता मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात.त्याशिवाय सर्वसामान्य लोकांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी सूचना मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच वकिलांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने करण्यात आली होती. अ‍ॅड. मिलिंद साठे आणि अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी याबाबत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निर्देश दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER