जीटी रुग्णालयात सामान्य उपचार सेवा सुरू करा – मागणी

GT Hospital

मुंबई : जीटी (गोकुळदास तेजपाल) रुग्णालयात (GT Hospital) सामान्य उपचार सेवा सुरू करा, अशी मागणी रुग्णालयातील डॉक्टर करत आहेत. हे रुग्णालय मार्चमध्ये कोविड उपचार केंद्र घोषित केल्यापासून येथील सामान्य उपचार सेवा बंद आहेत.

राज्य आरोग्य शिक्षण विभागाने रुग्णालयाला सामान्य उपचार सेवा सुरू करण्याची अनधिकृत परवानगी दिली आहे. पण या परवानगीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस लागतील.

जीटी रुग्णालय एप्रिलपासून कोविड उपचार केंद्र बनवण्यात आले. तिथे २२० खाटांची सोय आहे. २० खाटा अतिदक्षता (आयसीयू) विभागात आहेत. सध्या रुग्णालयात कोरोनाचे ५० रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होते आहे. रोज हजार – बाराशे रुग्ण आढळत असून शंभर-दीडशेना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडते आहे.

कोरोना साथीच्या (Corona) आधी जीटी रुग्णालय अस्थिरोग विशेषोपचार केंद्र होते. गेल्या सात महिन्यांत येथे एकही अस्थी-शस्त्रक्रिया झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER