संजय राऊतांची बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar - Sanjay Raut

मुंबई :- सामनाच्या अग्रलेखात भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा उल्लेख फेकुचंद पडळकर असा करण्यात आला आहे. त्यावरुन पडळकर यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

तसेच हा सामना आता जुना सामना राहिला नाही तर व्यापारी सामना झाला आहे. बाळासाहेबांच्या काळातील सामना वेगळा होता, अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर जोरदार टीका केली.

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकलं असतं, पण फेकूचंदना लोकशाही मार्गानं ढओल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाही भूमिका आहेच, असे शिवसेनेने म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : …तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते ;  शिवसेनेची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER