अनेक संघर्षातून निर्माण झालेला मुंबई-गोवा महामार्ग टोल मुक्त व्हावा : निलेश राणे

mumbai-goa-highway-toll-created-by-many-struggles-should-be-free-rane

सावंतवाडी : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व अनेक संघर्षातून मुंबई-गोवा महामार्ग निर्माण होत आहे. मुंबईकर चाकरमान्यांनी यापूर्वी या रस्त्याचा खूप त्रास काढला आहे. त्यामुळे यापुढे तरी त्यांचा कोकणातील प्रवास सुकर व्हावा यासाठीच माजी मंत्री खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी हा महामार्ग टोल मुक्त व्हावा या केलेल्या मागणीचे भाजप प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी समर्थन केले.

कोकणातील जनतेच्या हितासाठी होत असलेल्या चांगल्या गोष्टींचे नेहमीच समर्थन राहील, असे मत यावेळी राणे यांनी व्यक्त केले. मुंबई-गोवा महामार्ग हा फारच उशिरा मार्गी लागला असून सुमारे तीनशे किलोमीटर लांबीचा महामार्ग आधीच रेंगाळला आहे. यापूर्वी या रस्त्यावर अनेकांनी खस्ता खाल्ल्या आहेत. टोल झाल्यास त्यातून काय संघर्ष उभे राहतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामूळेच हा महामार्ग तो मुक्त व्हावा ही आमची देखील मागणी आहे असा पुनरुच्चारही यावेळी त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER