रुग्णालयाला आग : सुरक्षित स्थळी हलवताना रुग्णाचा मृत्यू

Death

मुंबई : मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयात आग लागल्यानंतर रुग्णांना हलवताना पांडुरंग कुळकर्णी (८२) या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण अजून कळले नाही. ही घटना सोमवारची आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला रुग्णालयातले जनरेटर पेटले.

आग रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात १०० खाटांची व्ययस्था आहे. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कुळकर्णी व्हेंटिलेटरवर होते. ४० रुग्णांना फोर्टिस येथे हलविण्यात आले. हाय ऑक्सिजनची गरज असलेल्या दोन रुग्णांना मनपाच्या सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER