खून लपवण्यासाठी रिकाम्या घराच्या भाड्यात भरले ५२ हजार

Arrested

मुंबई : भोईसर येथे राहणाऱ्या झा कुटुंबाने (Jha Family) सुनेचा खून (Murder) केला आणि खून लपण्यासाठी घर रिकामे न करता हरियाणात निघून गेले. फेब्रुवारी २०१९ पासून जुलै २०२० पर्यंत घरमालक जैन यांच्या बँक खात्यात नियमित भाड्याची रक्कम जमा करत राहिलेत. एकूण ५२ हजार रुपये जमा केलेत. मुंबई पोलिसांनी आरोपींना हरियाणातून अटक (Arrest) केली.

प्रकरण असे की, या घरात राहणारे पवन झा (५०), पत्नी बच्चूदेवी (४५) आणि मुलगा दीपक (२५) हे फेब्रुवारी २०१९ ला गावाला गेलेत. मात्र घर रिकामे केले नाही. जुलै २०२० पर्यंत घरमालक जैन यांच्या खात्यात न चुकता चार हजार रुपये महिना भाडे भरत होते.

दरम्यान, शंका आल्याने जैन यांनी जुलै महिन्यात घर उघडून पाहिले. घरात त्यांना एक कवटी सापडली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जैन यांच्या खात्यात झा जमा करत असलेल्या भाड्याच्या पैशांच्या व्यवहारावरून, बँकेच्या मदतीने झा यांचा पत्ता शोधला आणि झा परिवारासोबत त्यांची विवाहित मुलगी नितू ठाकूर हिलाही हरियाणातून खुनाच्या आरोपात अटक केली.

झा यांच्या घरात सापडलेली कवटी त्यांची सून, दीपकची पत्नी बुलबुल (२०) हिची असावी अशी पोलिसांना शंका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER