मुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले?- प्रवीण दरेकर

Pravin Darekar-Uddhav Thackeray.jpg

मुंबई : मंगळवारी मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला. कालच्या पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणी साठले. तर याचा रेल्वेगाड्यांवरही परिणाम झाला. एवढेच नाही तर मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी सुटीसुद्धा जाहीर केली.

मुंबई अक्षरशः तुंबली यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं करून दाखवलं, अशी उपरोधिक टीका प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे . प्रवीण दरेकर म्हणाले, “शिवसेनेने मुंबईची तुंबई केली आहे. मुंबईत वरवर कामं केली जात आहेत. ते मूळ मुद्द्याकडे लक्षच देत नाहीत. पावसाळा गेल्यानंतर काम करण्यासाठी ७ ते ८ महिने राहतात, तरीदेखील काहीही कामं केली जात नाहीत. मागील ३० ते ४० वर्षे  शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केलं?” ते पुण्यात बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER