बृहन्मुंबई मनपाने अग्निशमन दलाच्या खर्चात केली ५० टक्के कपात

मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०२० – २१ च्या मुंबई अग्निशमन दलाच्या खर्चात सुमारे ५० टक्के कपात केली आहे. ४ फेब्रुवारीला मनपाचे २०२० – २१ साठी ३३४४१ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले यात अग्निशमनसाठी १०४. ४५ कोटी रुपयांची तरतूद आहे. २०१९ – २० या वर्षात ही तरतूद २०१. ४३ कोटी होती. अग्निशमन दल तरतुदीतील निधीचा वापर करत नाही, असे अग्निशमन दलाचा निधी कमी करण्याचे कारण देण्यात आले. डिसेंबर २०१९ पर्यंत अग्निशमन दलाने तरतुदीत फक्त ९ टक्के निधी खर्च केला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत काही वाहने आणि यंत्रसामुग्री विकत घेऊन २४ टक्के निधी खर्च करण्यात आला होता.

रवीकुमारने आशियाई जेतेपदासह स्वतःला सिध्द केलेय ऑलिंपिक पदकाचे दावेदार

गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी माहिती दिली की, मुंबईत सुमारे चार लाख इमारती आहेत. अग्निशमन दलाच्या सध्याच्या क्षमतेत या सर्व इमारतींची आगीबाबतची सुरक्षा व्यवस्था तपासणे शक्य नाही. अग्निक्षमनचे मुख्य अधिकारी पी. एस. रहागढाले यांनीही अग्निक्षमनकडे असलेल्या अपुऱ्या व्यवस्था – साधनांची माहिती दिली. मुंबईत अग्निशमनच्या ७० ठाण्यांची गरज आहे पण फक्त ३५ उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.