इतकं लाचार कधीच वाटलं नाही…; कोरोनाची स्थिती सांगत डॉक्टरला अश्रू अनावर

Maharashtra Today

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. रूग्णांना कुठे बेड मिळेना तर कुठे ऑक्सिजन. मुंबईतील कोरोनाची परिस्थिती सांगताना (sharing-experience-of-mumbai-corona-situation) तर मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरलाही अश्रू अनावर झाले. डॉ. तृप्ती गिलाडा (Dr-trupti-gilada) कोरोनाची (Corona) सद्यस्थिती सांगत असताना ढसाढसा रडू लागल्या.

अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही. मुंबईची हालत खूप खराब आहे. मला इतकं हतबल, लाचार कधीच झाल्यासारखं वाटत नाही असं सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले.

तुम्हाला ताप आला तर पॅनिक होऊ नका. लगेच रुग्णालयात दाखल होऊ नका. असं घाबरून अनेक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना बेड्स मिळत नाहीत. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत. मी तुम्हाला विनंती करते, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे तर असं बिलकुला नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी 35 वयातील लोकही वेंटिलेटरवर आहेत, असं डॉ. तृप्ती गिलाडा यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button