मुंबईची लोकल सुरू करा, अन्यथा … ; मुंबई डबेवाल्यांची सरकारकडे मागणी

Mumbai Dabbawala - Local Trains

मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घेतले आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली . या गंभीर परिस्थितीत मुंबईतील (Mumbai) डबेवाल्यांना अनेक अडचणींचा सामना अकरावा लागत आहे . . गेले साडेपाच महीने डबेवाल्यांना रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबईत लोकल सुरू करा अन्यथा महिना ३ हजार रुपये अनुदान द्या अशी मागणी डबेवाल्यांकडून ठाकरे सरकारकडे (Thackeray Government) करण्यात आली आहे.

मुंबईत काही शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. त्यामुळे जसे कर्मचारी कामाला बाहेर पडत आहेत. तसा डब्यांसाठीदेखील फोन येत आहे. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोहच करायला सांगत आहे. पण लोकलसेवा जोपर्यंत पुर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईची लोकलसेवा सुरू करा अथवा डबेवाल्यांना महिना किमान ३ हजार रूपये अनुदान द्या अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER