मुंबई डबेवाल्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

Mumbai Dabbewala delegation visits Raj Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) जाहीर होऊन आता जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. याचा परिणाम डबेवाल्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुंबई डबेवाल्यांचे (Mumbai Dabbewala) शिष्टमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुंबई डबेवाला असोसिएशन यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती की, मुंबईच्या डबेवाल्यांची जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून डबेवाल्याला लोकलने प्रवास करू देण्यात यावा. परंतु, दोन महिने झाले तरी रेल्वे प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काही शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत. ज्या कार्यालयात शक्य आहे तिथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत.

परंतु जोपर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तोपर्यंत डबेवाला आपली सेवा पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही. दरम्यान सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेने सविनय आंदोलन पुकारले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गनिमी कावा करत लोकलने प्रवास करून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुंबई डबेवाला असोसिएशनने बिनशर्त पाठिंबा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER