राज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या

mumbai-dabbawala-meet-raj-thackeray-at-krishna-kunj

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईच्या डबेवाल्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.आज (24 सप्टेंबर) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांनी (Mumbai-dabbawala) त्यांच्या व्यथा राज ठाकरेंसमोर मांडल्या .

यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि डबेवाल्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली.

राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे.

मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केले . त्यामुळे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचे पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER