दादरच्या हिंदू कॉलनीत 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

Representational pic

मुंबई : मुंबईतील दादरमध्ये असलेल्या हिंदू कॉलनीमध्ये 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा मुंबई क्राईम ब्रान्चने जप्त केल्या आहेत.

यासंदर्भात क्राईम ब्रान्चला टीप मिळाली होती की, एका इनोव्हामधून 1 कोटींची रक्कम नेली जात आहे.

या प्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून इनोव्हा कारही ताब्यात घेतली आहे.

यामागे नोटा बदलणारं मोठं रॅकेट असून काळा पैसा पांढरा करण्याचं काम हे रॅकेट करत असल्याचं समोर आलयं.

मुंबई क्राईम ब्रान्चने १ कोटी पैकी 85 लाख जप्त केले आहेत, उर्वरित रकमेचं काय करण्यात आलं याचा मुंबई क्राईम ब्रान्च शोध घेताहेत. सोबतच ताब्यात घेण्यात आलेल्या सात ही जणांची चौकशी करण्यात येत आहे.