अखेर हरवलेल्या कोरोना रुग्णाची चार दिवसांनी बॉडी मिळाली; किरीट सोमय्या ठाकरे सरकारवर संतापले

Kirit Somaiya - CM Uddhav Thackeray

कोरोना मृत्युसंख्या लपवल्या जात आहे, परिवारांमध्ये कोरोनाचे संक्रमन झाल्यास ठाकरे सरकार जबाबदारी घेणार का, सोमय्यांचा संतप्त सवाल


मुंबई : केईएम हॉस्पीटलमधून एक कोरोना रुग्ण हरवल्याची तक्रार त्याच्या परिवाराने पोलिसात दिली होती. त्यानंतर तब्बल चार दिवसांनी त्या रुग्णाचे शव मंगळवारी मिळाले आहे. या घटनेवर भजपराचे नेते किरीट सोमय्या यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, ठाकरे सरकार कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्या लपवत असल्याचा आरोपदेखील किरीट सोमय्यांनी केला आहे.

दुस-या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांना तब्बल दहा तास रुग्णालयात बेड मिळाला नाही. एका डॉक्टर व्यक्तीला बेड मिळत नाही तेथे सामान्य रुग्णांची काय स्थिती असेल असा सवालदेखील किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा :- तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनाने मृत्यू, तब्बल 10 तास नाही मिळाला बेड

कोरोना रुग्ण हरवल्याची नातेवाईकांची तक्रार, चार दिवसानंतर शवगृहात रुग्णाची बॉडी सापडली –

70 वर्षीय कोविड – 19 पॉझिटिव्ह रूग्ण हरवल्याच्या तक्रारीनंतर तब्बल चार दिवसांनी म्हणजे काल मंगळवारी त्या गृहस्थाची डेड बॉडी केईएमच्याच अधिका-यांनी शवगृहात शोधून काढली.

भोईवाडा पोलिसांनी मिसिंगची नोंद केली होती आणि चौकशी सिरू होती. एका पोलिस अधिका-याने सांगितले की, “सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता त्यांचा मृतदेह शवगृहात हलविण्यात आल्याचे आढळले. परंतु दोन दिवस शोध घेऊनही त्या गृहस्थाच्या बॉडीचा शोध लागला नाही.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने मृत सुधाकर खाडे यांचा जावई अंकुश जाधव यांना बोलावले व त्यांनी त्यांचा मृतदेह ओळखला. 36 तासांपेक्षा जास्त वेळ निघून गेल्याने रुग्णालयाने कुटुंबीयांना तातडीने मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यानंतर जाधव आणि पालिकेच्या अधिका्यांनी मंगळवारी दुपारी खाडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

सुधाकर खाडे यांना 18 मे रोजी कोविडच्या लक्षणांमुळे केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्या अहवालात सकारात्मक चाचणी झाली त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. 19 मे रोजीच्या सकाळी 9.30 च्या सुमारास डॉक्टरांनी कुटूंबाला बोलावून खाडे गंभीर व व्हेंटिलेटर असल्याची माहिती दिली. 19 मे रोजी सकाळी5-30 च्या सुमारास रुग्णालयाने पुन्हा खाडे कुटुंबीयांना फोन केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही. सकाळी 10.30 च्या सुमारास जाधव यांना चौकशीसाठी बोलावले असता रुग्णालयाने त्यांना खाडेचा शोध घेण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

21 मे रोजी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून रुग्णालयाने जाधव यांना बोलावले. त्यानंतर खाडे यांनी भोईवाडा पोलिसांकडे संपर्क साधला आणि आपले सासरे सुधाकर खाडे रुग्णालयातून हरवले असल्याची तक्रार दिली. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनीही हे प्रकरण उचलून केईएम हॉस्पिटलच्या गोफ अप बद्दल ट्विट केले होते.

आता, सुधाकर खाडे यांचा मृतदेह केईएमच्याय शवगुहात सापडला आहे. यावरून कोरोना रुग्णांचा बाबत ठाकरे प्रशासन किती बेजबाबदार आहे अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

तसेच, डॉ. चित्तरंजन यांच्या मृत्युसाठीही ठाकरे सरकारचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचे सोमय्यानी म्हटले आहे.

दरम्यान, एका प्रकरणात एका रुग्णाला साधा निमोनियानी मृत्यू झाल्याचे सांगून त्यांच्या परिवाराने साध्या नेहमी प्रमाणे त्या मृतदेहावर अंतिम संस्कर केलेत मात्र अंतिम संस्कारानंतर त्या रुग्णाला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले अशावेळी त्या मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या परिवाराला कोरोना झाल्यास त्यांची जबाबदारी ठाकरे सरकार घेणार का असा सवालही किरीट सोमय्या यांनी सरकारला केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER