मुंबई काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; देवरा, निरुपम यांना ‘इथे’ पाठविणार

मुंबई : मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षांनी म्हणजे २०२२ मध्ये आहेत. काँग्रेसने या दृष्टीने रणनीती आखली आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांना मुंबई काँग्रेसच्या बाहेर काढून दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती आज शनिवारी पक्षसूत्रांनी दिली आहे.

Congress

दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अमरजितसिंह मन्हास, भाई जगताप आणि चरणसिंह सप्रा या तीन नेत्यांची नावे यासाठी आघाडीवर आहेत. पक्षातील अंतर्गत वाद आणि लोकसभेत दणकून झालेला पराभव यामुळे काँग्रेस नेतृत्वाला आता, मुंबई काँग्रेसमध्ये बदल हवा आहे, अशी माहितीही काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. सध्या एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, हे येथे उल्लेखनीय.