
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजपा-मनसे युतीबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी भाष्य केले आहे.
मेट्रोकार शेडचा मुद्दा राजकीय बनवला आहे. भाजपाने त्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. मुंबईकरांची आम्हाला काळजी आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू हा मुद्दा महापालिका निवडणुकीत राहणार नाही. तसेच भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कथित युतीत भाजपाने एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्वतःच बघावेत, असा टोला जगताप यांनी लगावला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला