सरकारमध्ये सुरू आहेत अनेक वाद

राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता (Ajoy Mehta) यांना फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे  (Uddhav Thackeray) सरकारच्या काळात नोकरीत मिळालेल्या मुदतवादीमुळे ते प्रकाशझोतात आलेत. ते सध्या मुख्यमंत्र्यांचे  स्वीय सल्लागार म्हणून काम करत आहेत. आता ते नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या तयारीत आहेत, असे कळते.

संघर्ष
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेहता यांनी वीज नियामक मंडळ (Electricity Regulatory Commission ) आणि बांधकाम नियामक मंडळाच्या (Real Estate Regulatory Commission ) अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. ही दोन्ही पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त होत असलेले राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार हेदेखील बांधकाम नियामक मंडळाच्या पदासाठी इच्छुक आहेत. तर वीज नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई आणि एमईआरसी सदस्य माजी ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर यांच्यासह २४ जणांनी अर्ज केले आहेत.

सध्या अधिकारी आणि वरिष्ठ मंत्र्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण यांच्या आक्षेपांमुळे आठ  उपसचिवांच्या बदल्या मुख्यमंत्री कार्यालयाला थांबवाव्या लागल्या आहेत.

कांजूरमार्गचा गुंता

मेट्रोच्या कारशेडसाठी सरकारने निवडलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर अनेकांनी मालकी हक्कासाठी दावे केले आहेत.  हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) याना माहीतच नव्हते, अशी चर्चा आहे. कांजूरमार्गच्या जागेबाबत कायद्याची काही अडचण नाही. त्यामुळे ही जागा कारशेडसाठी योग्य आहे, असे या दोघांनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पटवून दिले, असे कळते. मात्र, या जागेच्या चौकशीसाठी नंतर सरकारने नेमलेल्या सौनिक समितीने तिच्या अहवालात नमूद केले आहे की, या जागेबाबत अनेक खटले सुरू आहेत. तरीही या जागेबाबत मोठा गोंधळ सुरू आहे. कोणाला दोष देणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER