मुंबई शहर ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत तिसऱ्या गटात ; महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती

kishori pednekar - Maharastra Today
kishori pednekar - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे . हे पाहता ठाकरे सरकारने अनलॉकची प्रक्रिया चालू करण्याचा निर्णय घेतला आहे . यासंदर्भातील आदेश शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर तिसऱ्या गटात येत असल्याचे आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाच्या निकषानुसार आणि नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं असून, मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत आहे. आज पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुंबई शहरामध्ये करोना रुग्णसंख्या दुपटीचे दर 515 दिवस आहे.

सध्याच्या घडीला दोन आठवड्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यामुळे मुंबई ही तिसऱ्या गटापर्यंत आहे असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबई तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काळात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जातील. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असेही महापौर म्हणाला आहेत. राज्य सरकारच्या निकषांनुसार सायंकाळी मुंबईतील व्यवहारांसाठीचे एक परिपत्रक काढण्यात येईल. तेव्हा मुंबई शहरातील अनलॉकचे चित्र अधिक स्पष्ट होईल अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button