ग्राहकांचे ४२७ कोटी घेऊन पळालेला बिल्डर लक्ष्मण भगतानी इंटरपोलच्या ताब्यात

arrested

मुंबई :- गाहकांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन, त्यांना फ्लॅट न देता परदेशात पळून गेलेला बिल्डर लक्ष्मण भगतानी याला संयुक्त अरब अमीरात येथे इंटरपोलने ताब्यात घेतले.

लक्ष्मण भगतानी (Laxman Bhagatani) जेव्हीपीडी प्रॉपर्टीज लि.चा संचालक आहे. त्याने त्याच्या ९ प्रकल्पात फ्लॅट देतो असे सांगून सुमारे अडीच हजार ग्राहकांकडून ४२७ कोटी रुपये घेतले आणि पळून गेला. याबाबत मीरा रोड पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. नोव्हेंबर २०१८ ला लक्ष्मण भगतानीविरुद्ध रेडकॉर्नर नोटीस बजावण्यात आली. पोलिसांच्या आर्थिक आघाडीचे अधिकारी राजवर्धन सिंहा म्हणाले की – लक्ष्मण भगतानीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीसांनी त्याचे, त्याची मुले मुकेश आणि दीपेश व त्याच्या दोन कंपनीचे १२५ बँक खाते गोठवले आहेत.

लक्ष्मण भगतानी याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठित विशेष टीमचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख (Dilip Deshmukh) यांनी दीपेशला अटक केली असून त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मुकेश फरार आहे. पोलिसांनी भगतानीच्या चार मालमत्ता जप्त केल्या आहेत आणि तीन न्यायालयाने नियुक्त केलेल्या लिक्विडेटरच्या ताब्यात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER